आपण असमाधानी व दुःखी का आहोत?
आपण असमाधानी व दुःखी का आहोत? ------------------------------------------------- आपण असमाधानी व दुःखी का आहोत यावर विवेचन करताना कृष्णमूर्ती असे म्हणतात की आपण पाहतो की आपले आयुष्य हे त्याच त्याच चाकोरीतून जात आहे. आपण एकटे आहोत किंबहुना या एकटेपणाने आपण ग्रासलेले आहोत .आपल्या जगण्याला खरोखरच काही अर्थ नाही. त्यामुळे त्या जगण्यात काही अर्थ शोधण्यासाठी, त्यात समाधान आणण्यासाठी, संतोष मिळवण्यासाठी आपली धडपड चाललेली असते. तर आपण असे असमाधानी आहोत त्याचे मुख्य कारण आहे, आपण सदैव तुलना करत असतो .आपण सदैव "जे आहे" त्यामध्ये बदल करू इच्छितो. कारण "जे आहे" त्याचे नेमके काय करावे ते आपल्याला कळत नाही. तर मग आपण वेगळ्या कल्पना, स्वर्गातील रचना, किंवा आदर्श, किंवा देव-देवता यांना आपल्यासमोर ठेवून तसे तिकडे जाण्याचा प्रयत्न करतो. या कल्पनावर आपले आयुष्य बेतलेले असते त्या दिशेने आपल्या सर्व क्रिया घडत असतात ह्या सगळ्या कृती म्हणजे "जे आहे" त्यापासून जणू काही पलायनाच असते. आपण जे आहोत किंवा सध्या "जे काही आहे" ते आपल्याला नको असते आपण काहीतरी व